पावसा ये रे पावसा
दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा रे
पावसा ये रे पावसा
दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा रे
पावसा ये रे पावसा
पावसा ये रे पावसा
बघ जिवाची किती होतसे काहिली
बघ जिवाची किती होतसे काहिली
ही घनांची कवाडे आता कर खुली
धीर नाही रे फारसा
धीर नाही रे फारसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा रे
पावसा ये पावसा ये पावसा ये रे पावसा
अंबराचा तुझा देश सोडून ये
अंबराचा तुझा देश सोडून ये
आसवे सांगती तूच दाटून ये
दे तुझा दे दिलासा
दे तुझा दे दिलासा
देते कधीची तुला हाक माझी तुषा रे
पावसा ये रे पावसा
दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा रे
पावसा ये रे पावसा